Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Gajtiya Dhol from album Gajtiya Dhol

Lyrics of Gajtiya Dhol from album Gajtiya Dhol

10. गाजतया ढोल नि वाजतीया टाळ



गाजतया ढोल नि वाजतीया टाळ ।
या बापूच्या नावाचं, माझ्या ईश्वाच्या राजाचं ॥धृ॥

मानसाच्या रानात रानाच्या मानसात, मनाच्या गुहेत गुहेच्या मनात ।
अनिरुद्धाचं भजन, माझ्या अनिरुद्धाचं भजन ॥१॥

भूईच्या डोयाला डोयाच्या भूईला, कानाच्या शिंप्याला शिंप्याच्या कानाला ।
अनिरुद्ध गावला, माझा अनिरुद्ध गावला ॥२॥

पावसाच्या धारा नि वाहता वारा, नदीच्या धारा नि सागरी लाटा ।
अनिरुद्ध ऐकला, माझा अनिरुद्ध ऐकला ॥३॥

ढोलाच्या तालात नाचतोया जन, टाळाच्या आवाजी रंगतीया मन ।
चला खोदुया सुखाची खाण, बापू कडं ना कसली वाण ॥४॥