Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Ek Vel Tu Sahajachi Ye Re from album Ailatiri Pailatiri

Lyrics of Ek Vel Tu Sahajachi Ye Re from album Ailatiri Pailatiri

16. एकवेळ तू सहजचि ये रे



एकवेळ तू सहजचि ये रे, अनिरुद्धा मम घरी।
आगमनाची वाट पाहतो, दे मज तूचि सबुरी ॥

मम हृदयीच्या आसनावरी, अनिरुद्धा तू पद ठेवी ।
तव चरणांची आस मोठी, दे मज तूचि सबुरी ॥

मम भक्तीची पुष्पमाळ ही, अनिरुद्धा स्वीकारी ।
तव कृपेचे तीर्थ हवे मज, दे मज तूची सबुरी ॥

हे रमेच्या रमाकांता, अनिरुद्धा तू उमारमणा ।
क्षितिजावर तू नकोस राहू, नको नको ही सबुरी ॥