Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Dolyanchi Bhasha from album Pipasa5

Lyrics of Dolyanchi Bhasha from album Pipasa5

डोळ्यांची भाषा माझी



डोळ्यांची भाषा माझी जाण अनिरुद्धा ।
मनातील भाव माझ्या तुझे रूप ल्यावा ॥धृ॥

कुणासाठी चाललासी लक्ष लक्ष पाउले ।
भक्तकाजासाठी देवा वराह रूप धरिले ॥१॥

सर्वकाही करूनही अहंकार तुजला नाही ।
प्रेम आंधळे रे तुझे, दोष अमुचे पाहत नाही ॥२॥

ऐसा कैसा भक्तांसाठी राहसी तू भावभोळा ।
जमाखर्च मांडत नाही, आगळाचि तुझा ताळा ॥३॥

ऐशा लीला पाहतांना पिसा विरघळूनी जावा ।
सावळ्या आकाशी तुझ्या भक्त सावळाच व्हावा ॥४॥