Lyrics of Dhup Deep Zala Ata Kapoor Aarti from album Ganapati Aarti

धूप दीप झाला आता कापूर आरती
धूप दीप झाला आता कापूर आरती । देवा कापूर आरती ।।
रत्नजडित सिंहासनी भगवता मूर्ती ॥ धृ ॥
कर्पूरासम निर्मल माझे मानस राहू दे ।।
देवा मानस राह दे ॥
कर्पूरासम भावभक्तीचा सुगंध वाहूदे ॥१॥ धूप दीप...
कापुराची लावून ज्योती पाहीन तव मूर्ती ॥
देवा पाहीन तब मूर्ती ।।
नयनी साठवू ही भगवंत मूर्ती ॥ २॥ धूप दीप..
ज्ञान कळेना ध्यान कळेना । कळेना काही ।
देवा कळेना काही ।।
शब्दरूपी गुंफूनी माळा , बाहतसे पाची ॥३॥ धूप दीप...
नेत्री ध्यान मुखी नाम, हृदयी तव मूर्ती ॥
देवा हृदयी तव मूर्ती ॥
भावभक्तिन केली देवा , कापूर आरती ॥४॥ धूप दीप...