Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Dharlele Sodu Nako Re from album Pipasa 3

Lyrics of Dharlele Sodu Nako Re from album Pipasa 3

धरलेले सोडू नको रे



धरलेले सोडू नको रे,
जोडलेले तोडू नको रे।
पकडलेले टाकू नको रे,
तळमळ माझी जाणून घे रे॥

मज पामरा ज्ञान न समजे
कथापुराणी देव न गवसे
जपतप करण्या चित्त न सरसे
तुझिया भजनी चूक न घडू दे॥

माय-तातही सोडूनि जाती
नाती-गोती ही कामापुरती
स्नेहबंधही वेळीच तुटती
एक तूचि रे धरूनि राहसी॥

मंत्र यंत्र अन् तंत्र न जाणे
शास्त्र हवन अन् योग न झेपे
अशा मानवा एकच सोपे
नाम-रूप अन् कीर्तन तुझे॥

इंद्रधनु ते मोहून गेले
क्षितीज भूमीचे टोक भासले
फळ वृक्षाचे श्रेष्ठ वाटले
भ्रम हे अवघे तूचि दवडिले॥

प्रपंचात तव शब्दे तरलो
परमार्थी तव शब्दे भुललो
शब्दब्रह्म हे तुझ्याच ओठी
पिपा शब्द अन् तूच सारथी॥