Lyrics of Dhanya Dhanya Ho Pradakshina from album Ganapati Aarti

धन्य धन्य हो प्रदक्षिणा
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची ।
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ॥ धृ ।।
पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी ।
सर्वही तीर्थे घडली आम्हा आदिकरूनि काशी ॥१॥
धन्य धन्य हो ...
मृदंग टाळ ढोल भक्त भावार्थ गाती ।
नामसंकीर्तनें ब्रह्मानंदे नाचती ॥२॥
धन्य धन्य हो ...
कोटी ब्रह्महत्या हरिती करिता दंडवत ।
लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायांत ३ ।।
धन्य धन्य हो ...
गुरुभजनाचा महिमा न कळे आगमनिगमांसी ।
अनुभव ते जाणती जे गुरुपदिचे रहिवासी ॥ ४ ॥
धन्य धन्य हो ...
प्रदक्षिणा करून देह भावे वाहिला।
श्रीरंगात्मज विठ्ठल राहिला ॥५॥
धन्य धन्य हो ...