Lyrics of Dhanya Dhanya Bapu from album Gajtiya Dhol

1. धन्य धन्य बापू सत्वगुणी
धन्य धन्य बापू सत्वगुणी, आहे चक्रपाणी ।गोड त्यांची वाणी, अमृतघट भक्तजना पाजतात।
भक्ताचे सामर्थ्य देतात, भक्तांचे हात तया जुळतात, जी जी जी ॥ धृ॥
त्रिपुरारी पौर्णिमेला आले, जन्मा घातले ।
बाळकृष्ण आले, धन्य ते माय-बाप झाले ।
अनिरुध्द नाव त्यांचे ठेवीले ।
कृष्णलीला सकल जना दावितात, जी जी जी ॥१॥
कलेकलेने बाळ वाढले, शेषासवे खेळे ।
ध्यानी नाही आले, पोटी हे देव जन्मा आले ।
भाग्यवान माय-बाप झाले ।
माय-बाप उतराई होतात, जी जी जी ॥२॥
अनिरुध्द मोठे हो झाले, प्रयत्न केले ।
डॉक्टर हो झाले, दिन दुबळ्यांची सेवा करण्या ।
उद्धरण सकल जना करण्या ।
भक्तांना आशिष ते देतात, जी जी जी ॥३॥
झाले हात दोनाचे चारऽ वहिनी सुंदर कष्टाळु फार ।
बापूंचे ऐकून सुविचार, प्रपंची परमार्थ करितात ।
जणू लक्ष्मी विष्णू शोभतात, जी जी जी ॥४॥
लक्ष्मीला झाली दोन बाळे ।
वंशवेल फुले, संसार तो खुले ।
बापू ही धन्य धन्य झाले ।
बाळांना विद्यार्जन दिधले ।
बाळे आज्ञापालन करितात, जी जी जी ॥५॥
बापू प्रपंचात गुंतला, परमार्थ केला ।
साई भेटला, गुरुने उपदेश केला ।
बापू हरि नामात रंगला, जगाचा उद्धार करण्या, जी जी जी ॥६॥
पूर्णब्रह्म बापू ही झाले, सुचितदादा आले ।
कार्य एक केले, सकलजना भक्ती मार्गा दावितात ।
मुक्तकंठाने ग्वाही देतात ।
अशक्य काही नाही जगतात, जी जी जी ॥७॥
रसयात्रा करू लागले, भक्त रंगले ।
बापू हासले, समर्थ साईराम दिसले ।
विठ्ठल शिवकृष्ण भेटले, भाव तसा देव भेटवितात, जी जी जी ॥८॥
चुक माझी पदरात घ्यावी, आज्ञा मला द्यावी ।
बहिण मानावी, अनिरुध्दा काय मी गुण गाऊ ।
क्लेशनिवारण करण्या ये तू ।
मनाला समर्थ करुनी तू ।
समर्थ सद्गुरु मज भेटतात, जी जी जी ॥९॥