Lyrics of Devyaan Panthi from album Pipasa Pasarali

देवयान पंथी पार्थाचा सारथी
देवयान पंथी पार्थाचा सारथी। तोच माझा साथी अखेरीचा ॥ धृ ॥
क्षणाचे सांगाती सारे गणगोत। गुरुचि सोबत राही नित्य ॥
चित्ती होता ऐक्य भेटे तो एकांती। नंदामाईचा पती अनिरुध्द ॥ १ ॥
खरा भक्तसखा सद्गुरु सदैव। ऐसी त्याची माव तोचि राखी ॥
योगीन्द्र न सोडी त्यासी एक क्षण। घेतले बांधून त्याच्या पायी ॥ २ ॥