Lyrics of Dehachi Gokul from album Pipasa Pasarali

देहचि गोकुळ
देहचि गोकुळ आत्मा हा गोविंद ।
आनंदे अनिरुध्द रचे रास ॥ धृ ॥
प्रज्ञा हीच नंदा ओजचि सुचित ।
प्राण पिपा भक्त उत्कटचि ॥ १ ॥
श्रध्दा नि सबूरी धमनी रोहिणी ।
राही विरहाग्नि नाभिठायी ॥ २ ॥
शुध्द प्रेम भाव आन्तरकुंभक ।
वैराग्य विवेक आलोचकी ॥ ३ ॥
योग्या अनिरुध्दी अवघी तत्त्वे देही ।
रास शेषशायी खेळे सतत ॥ ४ ॥