Lyrics of Davuni Lila from album Pipasa5

दावूनी लीला अपरंपार
दावूनी लीला अपरंपार,
करीतसे प्रेमही धुवाँधार ।
असा हा कोण असे सांगा
एकला अनिरुद्ध माझा ॥१॥
रानी-वनी मी सार्या फिरलो
वारुळात मुंगीच्या शिरलो
मुंगीच्याही मागून फिरलो
राणी, वारुळ, साखरदाणा, एकला अनिरुद्ध माझा ॥२॥
नदीतून मी सागरी आलो
समुद्रातळी खेळत बसलो
वाफ बनून मी उंच उडालो
सागर-गगनाचा बंधारा, एकला अनिरुद्ध माझा ॥३॥
आई वेदने प्रसवी बाळा
सिंह रक्षती देव-धर्मा
गंगा क्षाली पाप-कर्मा
प्रेम, ओज अन् तीर्थकिनारा, एकला अनिरुद्ध माझा ॥४॥
प्रेम-भक्तिला जेथ निवारा
प्रयास-कष्टा जेथ विसावा
भय-खेदाला जेथ न थारा
हृदयी धरा हा शब्द पिपाचा, एकला अनिरुद्ध माझा ॥५॥