Lyrics of Damdar Tuzi Paule from album Pipasa5

दमदार तुझी पाऊले
दमदार तुझी पाऊले, चालतो सिंहासरसा कसे ।
तुला मी आदर्श पाहीले, माझा नायक मानले ॥१॥
तुझी चाल अनुसरताना, धडपडली पाऊले ।
परी तू स्वतः येऊनी, चालणे शिकवीले ॥२॥
मधु-मधुरा ही तुझी वाणी, तरीही खंबीर असे ।
प्रेम उपजवी सहजपणाने, खडका दगडामधे ॥३॥
तुझे बोलणे अनुसरताना, बोल बोबडे झाले ।
तव नामाची चवी चाखता, शब्द वाहू लागले ॥४॥
घेतले जे जे काम मी हाती, ते ते बिघडत गेले ।
कल्पनेने चरण चूरता, काम उभे राहिले ॥५॥
हातातील धन समुद्रातळी, घरंगळून पडले ।
तव चित्रासह उडी मारता, धनची वरती आले ॥६॥
पिपा सुखाने वस्ती करतो, हरभर्याच्या रोपावरी ।
कारण तूचि भार वाहतो, मला काय काळजी ॥७॥