Lyrics of Daha Dishanni from album Bol Bol Vaache

12. दहा दिशांनी
दहा दिशांनी विस्कटली ही जीवनाची घडी।
कसा कुठे मी आवर घालू, कुठे धरु आकार?॥धृ॥
नाही शांतता, नाही धैर्य, नाही मिळाली शक्ती।
कसा कुठे मी शोधत राहू, कुठे मिळे आधार?॥१॥
दिवसांमागून दिवस चालले वाढत जाती चिंता।
कसा कुठे मी हासत राहू, कुठे असे उपचार?॥२॥
प्रयत्नांच्या पाउलवाटा अन्ती निघाल्या विगती।
कसा कुठे मी चालत राहू, कुठे करू तक्रार?॥३॥
अनन्यभावे आलो पायी दावा मज संगती।
श्रीअनिरुद्धा भक्तिविना तव, कुठे धरू निर्धार॥४॥