Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Daar Ughad from album Gajtiya Dhol

Lyrics of Daar Ughad from album Gajtiya Dhol

7. दार उघड बापू दार उघड



दार उघड, बापू दार उघड, दार उघड, बापू दार उघड।
दार उघड बापू दार उघड बापू दार उघड बापू दार ॥धृ॥

वियोग नको हो बापू, आता वियोग नको नको ।
कलीशक्तीही लागली पाठी, उघडावे हो दार ॥१॥
पालखी गेली हत्तीही गेला, ध्वजही गेला धर्माचा ।
तात्या, लक्ष्मी, संभाजीचे, रक्त न आठवे का तुजला ॥२॥

ऋषीमुनींची महत्ता गेली, धर्मकर्मी हो अनाचार ।
चोहोदिशांनी देश गांजला, यावे यावे सत्वर ॥३॥

दीन दुबळ्या आम्हा कोणी, तुझ्यावीण वाली नाही ।
दार उघडा आता तुम्ही, घटत चालली सबुरी ही ॥४॥

सावळ्या विठ्ठला दार उघड, दार उघड बापू दार ।
सदगुरु समर्था दार उघड, दार उघड बापू दार ।
चक्रधरा दार उघड, दार उघड बापू दार ।
कोदंडधरा दार उघड, दार उघड बापू दार ।
अनिरुद्धा दार उघड, दार उघड बापू दार ॥५॥