Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Chipalyanchya Talavari from album Pipasa 1

Lyrics of Chipalyanchya Talavari from album Pipasa 1

८. चिपळ्यांच्या तालावरी



चिपळ्यांच्या तालावरी मन डोल झालो ।
अनिरुध्द अनिरुध्द अमृतचि प्यालो ॥ धृ ॥

अमृतचि प्यालो आता कैसी भीती ।
साहीजण आले तरी, मारीन अतिथि ।
कामक्रोधावरी, स्वये आरूढलो ॥ १॥

छंद जीवनाचा, मंत्र सावळ्याचा ।
श्वास कैवल्याचा, प्राण चाकरीचा ।
दु:ख भोग सारे, जाळून निमालो ॥ २॥

नाही मागणार आता, दुजे पिपा राया।
आम्हालागी धावताना, थकलासी देवा।
तुझ्या दिव्य चरणां, सेविण्यासी आलो ॥ ३॥