Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Charni Nivas from album Pipasa Pasarali

Lyrics of Charni Nivas from album Pipasa Pasarali

चरणी निवास



चरणी निवास अंगुष्ठाचे ध्यान ।
अवघे अवगाहन चंद्रभागी ॥ धृ ॥

मुक्ति नको मज नको बा वैकुंठ
मिळो वाळुवंट तुझ्या पायी ॥
नको तुजवीण कोणाचे दर्शन
बापु नंदारमण जडो डोळा ॥
हेचि मागत आलो, हेचि पुढे मागू
पिपा संतसंगु नामपाठ ॥
योग्या मुंगी जैसी जन्मोजन्मी खोडी
गूळ ना तो सोडी तुटो मुंडी ॥