Lyrics of Bhooloki Janma Gheta from album Pipasa 3

भूलोकी जन्म घेता
भूलोकी जन्म घेता,
जन्म-मरणाचे चक्र ।
नाही चुकले कुणाला,
भय, दुःख मागे लागे ॥
बापूराया धाव घे रे, मायबापा धाव घे ॥
सुखासाठी श्रम सारे,
अहोरात वणवण ।
ओझी वाहतो कर्माची,
भार वाढतची राहे ॥
प्रश्न उठती रोजच,
एका मागोमाग एक ।
जाळे विणतो आम्हीच,
आणि अडकतो त्यात ॥
अनिरुद्ध येता अवघा,
जाळे कापत राहिला ।
ओझे माझे घेऊनीया,
मला म्हणे बा लेकरा॥
सूर्य पुरवीतो अन्न,
तरी देई त्रास ताप ।
बापू पुरवीतो सर्व,
नाही कधी देत शाप॥
नदी पुरवी जीवन,
तरी महापुरी भय ।
ह्याचा प्रेमाचा रे पूर,
बुडत्याला तारण्यास॥
बापू तुझ्या प्रेमासाठी,
भस्म्यारोग झाला मला ।
पिपा खातो पितो प्रेम,
जन्म-मरणातून सुटला॥