Lyrics of Bhavala Aniruddha from album Pipasa5

भावला अनिरुद्ध
भावला अनिरुद्ध मजला ।
धावून धावून थकलो असता, हाचि घरी आला ॥धृ॥
प्रसंगी हाचि रे उभा ठाकतो ।
हात पसरूनि जवळी घेतो ।
निर्णय अमुचे चुकले असता, हाचि मध्ये आला ॥१॥
कधी कुठे मी काय करतो ।
काय बोलतो, काय वागतो ।
कितीही चुका त्या घडल्या असता, हाचि साह्य झाला ॥२॥
परमप्रेम तो शुद्ध ब्रह्म तो ।
भक्तांसाठी धरणी येतो ।
ओळख ह्याची पटली असता, त्रिविक्रम दिसला
पिसाला त्रिविक्रम दिसला ॥३॥