Lyrics of Bharud from album Gajtiya Dhol

5. भारुड
आव आव आव आव उटता का जरा।
घरा बाहेर पडीन म्हणलं तर दारापुढं बघा काय ते?
अगं काय हाय?
दारापुढं हाय अजगर । बाप रं! खरच की ।
व्ह्य व्ह्य अजगर अजगर !
येऽऽवडा मोट्टा लांबच्या लांब
पसरलया धुडं स्मशाना पातूर ॥धृ॥
यो बाहेर पडू दिना । यो सुखानं जगू दिना ।
आता काय बाबा करू? कुनाला सांगू? कशानं मारू? कसा हो तरु ।
आता खायाचं काय? आन् पियाचं काय?
पियाचं पानी पन न्हाई । मी हिअरीला जाऊ ग कैसी? ॥१॥
हा तर पसरला स्मशानापर्यंत । आता मर पर्यंत ह्याचाच धाक
घराबाहेर पडू दिना, कंची काम बी होऊ दिना ॥२॥
अगं वडावरचा कावळा ओरडतोय । आजा लागतो माझा तो आजा
काय म्हनतो आजा तुमचा? जरा पुसा की त्याला उत्तारा
अगं सजने ऐक जरा तू । कान लावुनी वाणी ।
बुद्धी माझी आई आणि । बाप तिचा गे भक्तीभाव । खरचं ग बाई!
अजगर आहे प्रारब्धाचा । करू देई ना काही गं
जिकडे जाईन तिकडे येउनी गिळू पाहे हा अजगर ॥३॥
ह्या अजगरा मारायाला । आजा सांगतो शस्त्र नसे
नाही संपणार हा कुठल्याही अस्त्रानं । याला आवरायला महागारुडी हवा
अगं ह्या गारुड्याचं गारुड हाय लै जबरदस्त
नुसतं नाव रटता ह्याचं पळून जाईल हा अजगर
आव मग बिगी बिगी नाव घ्या की ॥४॥
नाव घेऊ अनिरुद्ध माझा सावळा अनिरुद्ध
आव खरचं की कुठच्या कुठं दूर पळाला हा अजगर
नाव घेऊ अनिरुद्ध माझा सावळा अनिरुद्ध
जय हरी अनिरुद्ध श्री हरी अनिरुद्ध ॥५॥