Lyrics of Bharlya Dolyanni from album Pipasa 4

भरल्या डोळ्यांनी
भरल्या डोळ्यांनी मी घेतो दर्शन वारंवार।
बापू रे जासी हृदयापार॥
प्रतिमा, मूर्ति, चित्रे, ताईत
ठायी ठायी असती अगणित
तव तेजाच्या बिंदूनेही, खाई शत्रू मार॥
चिलखत तुटते, घर कोसळते
परि न तुझी छाया ढळते
तव कवचाच्या चिंतनेही, रक्षण होय अपार॥
प्रेम हवे तुज सर्व जाणती
भक्ति करण्या आतुर असती
परि शिकवावे तुझ्या विना कुणी,
प्रेम कसे करणार॥
अमुची कर्मे तूच जाणसी
अमुच्या यत्ने रूप आणिसी
पिपास घडवून धरिले करी तू,
तैसा रहा उदार॥