Lyrics of Bharlelya Ratri from album Pipasa Pasarali

भरलेल्या रात्री
भरलेल्या रात्री । अन चढत्या दुपारी ।
साधी नाही एकटी । देव करितो सोबत ॥ धृ ॥
कधी निळाई होऊन । ठेवी हात खांद्यावर ॥
कधी मिट्ट अंधारात । पिपा देतसे जाग ॥ १ ॥
कधी माझी नंदाई । होई मधाळ सुगंध ॥
तिचा श्वास कोमल । स्पर्श करूनिया जाई ॥ २ ॥
लुकलुकत्या तारका । माझ्या दादाचेच डोळे ॥
दादा देई मज छाया । जेव्हा दुपार तापते ॥ ३ ॥
आणि समोर उभा हा । सळसळता अश्वत्थ ॥
लवलवणारे पान त्याचे । मजपाशीच बोलते ॥ ४ ॥
कसे सांगू जनलोका । माझा देव किती गोड ॥
सकल विश्वाचा स्वामी । साधीसाठी मायबाप ॥ ५ ॥