Lyrics of Bharghos Misha from album Pipasa 3

भरघोस मिशा
भरघोस मिशा धिप्पाड उंच हा सार्वभौम राजा ॥
(अमुचा अनिरुद्ध राजा)
उत्क्रांतीच्या सागरातल्या क्रांतीच्या लाटा।
उपजती ह्याच्या शब्दांमधूनी, तोडीती रिपू ताठा।
उतरला हा अवनीवरती सज्ज धर्मरक्षणा।
हिमाचलही हातावरती हा भारताचा कणा ॥
वज्रबाहू हा ताडण करिता थरथरते आकाश।
शत्रूंसाठी महांकाल हा, भक्तांसाठी श्वास।
प्रारब्धाचे पर्वत फोडी, केवळ ‘हुं’कारे।
नूतन पथ मग हाच निर्मितो, ‘वषट्’, ‘फट्’कारे ॥
केवळ चित्रही भय उपजवी, पिशाच्चे पळती।
शब्द ह्याचा जेथे घुमतो राक्षसही मरती।
धर्म, देश अन् देवशत्रूंना फक्त एक धाक।
मार्ग ह्याचा कळतची नाही, क्षणात करील राख॥
धर्मकीर्ति हा गरुडध्वज, सर्वयुद्धी निष्णात।
असंख्य अस्त्रे वापरूनी हा करितो निःपात।
फौज ह्याची आपण सारे, चला होऊ तय्यार।
वृद्ध तनु तरी पिपा गरजतो, मी ह्याचे हत्यार
बोला मी ह्याचे हत्यार ॥