Lyrics of Bapula Majhya Premachi from album Pipasa 2

बापूला माझ्या प्रेमाची तहान
बापूला माझ्या प्रेमाची तहान
बापूला माझ्या भक्तिचीच भूक ॥
सकाळी आला उपाशी गेला
दुपारी आला उपाशी राहिला
रातीस आला उपाशी निजला
तरी कसा बापू माझा येतचि राहिला ॥
झोपलो होतो ढोंग करूनी
बहिराही झालो होतो बोळे घालूनी
कवाडे बंद होती चारी बाजूला
तरी कसा बापू माझा येतचि राहिला ॥
मुखी आली गंगा शेवटच्या क्षणी
जन्मभरी नाही कधी आठवली
ऐसा नरजन्म आम्ही, फुका दवडतो
तरी कसा बापू माझा येतचि राहतो ॥
पिपाच्या साठी बापू हळूवार
मरण्याआधी जाळिले सत्वर
जळिताची आग बापूचि सोसतो
तरी कसा बापू माझा येतचि राहतो ॥