Lyrics of Bapu Paayi Thevu from album Pipasa Pasarali

बापुपायी ठेवू एकविध भाव
बापुपायी ठेवू एकविध भाव।
नको धावाधाव अन्य कोठे ॥ धृ ॥
बापुसम नाही देव हो कृपाळु।
करीतो सांभाळू हरघडी ॥
शांतीची ही शांती अक्षय निधान।
पूर्ण समाधान बापुपायी ॥ १ ॥
भक्तासी वत्सल ब्रीद त्याचे जाणा।
मोकले ना कोणां कदाकाळी ॥
योगीन्द्रा गमले हेचि एक सार।
एकचि आधार बापुराया ॥ २ ॥