Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Bapu Bol Bapu Bol from album Ailatiri Pailatiri

Lyrics of Bapu Bol Bapu Bol from album Ailatiri Pailatiri

11. बापू बोल



बापू बोल, बापू बोल
बापू बोल, बापू बोल, बापू बोल ॥

नको साधन दुजे ते ।
नको यजन दुजे ते ।
नको स्मरण दुजे ते ॥
सुखशांतीचे निधान।
माझ्या बापूंचे विधान।
करी पापांचे मर्जन ॥

पथ भक्तीचा हा सोपा ।
बापू नाही धरी कोपा ।
त्याचे नाम रोज जपा ॥

शरण ह्याच्या पायी आले ।
त्यांचे भाग्य उमलले।
सर्व दुःख निवटिले ॥

होते सार्थक जीवाचे ।
मिळे सामर्थ्य मनाचे।
टळे प्रारब्ध कर्माचे ॥