Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Bapu Bhetla Jya Kshani from album Pipasa 1

Lyrics of Bapu Bhetla Jya Kshani from album Pipasa 1

१. बापू भेटला ज्या क्षणी



बापू भेटला ज्या क्षणी।
मन हे जाहले उन्मनी।
माझा अनिरुध्द प्रेमळा।
त्याला माझिया कळवळा॥

अतूट बंधनाची गोडी ।
चरणी घातली ही मिठी ।
करून वासनांची धुनी ।
मजसी उध्दरिले हो झणी ।
त्याचा हस्त शिरावरी ।

कैसी उरेल आता भीती ।
तुझे रूप मी पाहणे ।
दुजे काही न दिसणे ।

मर्मबंधाचे मागणे ।
फक्त भक्तिचे लागणे ।
पिपा सर्व जन्मांतरी ।
राहो तुझिया अंतरी ।