Lyrics of Bapu Bhetichi Odh Mala Lagali from album Gajtiya Dhol

6. बापू भेटीची ओढ मला लागली
बापू भेटीची ओढ मला लागली ।
माझ्या जीवाची घालमेल झाली ॥धृ॥
काय करावे काही कळेना, संसारी ह्या मन रमेना ।
माझ्या मनाची तगमग वाढली ॥१॥
शोधू कुठे मी पाहू कुठे मी, साद तुला रे घालू कशी मी ।
तुझ्या चरणाची धूळ भाळी लावली ॥२॥
मी तुमच्या दासाचा दास, मनी माझिया एकची ध्यास ॥
तुझ्या भक्तीची आस उरी लागली ॥३॥