Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Bapu Bapu Ulhase from album Pipasa 1

Lyrics of Bapu Bapu Ulhase from album Pipasa 1

११. बापू बापू उल्हासे



बापू बापू उल्हासे।
निघे पालखी बापूंची
ध्वज माळा नि तोरणे।
चिपळ्या झांजा वाजती ॥

धन्य धन्य वाटे सर्वां।
नाचती जयजयकार करिता॥
धरूनी छंद बापू बापू ।
गाती वैष्णवांचे थवे ॥

अवघ्या सोडियेल्या वाटा।
धुंद झाले बापूनामे ॥
पाया लागेना हो माती।
कैसी उधळती फुले ॥ २ ॥

चोहो दिसे गुलाल बुक्का।
रंग इंद्राचे लाजले ॥
ओस पडली स्वर्गनगरी।
देव धावत आले इथे ॥
भक्तां सुखाची पर्वणी।
वाहती पादुका आनंदे॥
पादुका म्हणू ह्या कैशा।
दिसती चक्रपाणि उभे ॥

अनिरुध्द चक्रपाणि।
रूप सावळे गोजिरे॥
पिपा सेवितो पायांना।
सकळ भोई पालखीचे ॥