Lyrics of Bapu Aniruddha Hari from album Pipasa 1

२४. बापू अनिरुध्द हरि
बापू अनिरुध्द हरि, गर्जे पिपाची वैखरी ।
पिपा भक्तांचा पाटील, त्याने धरिला विठ्ठल ॥
गाठ बांधूनी प्रेमाची, भेट घडवी विठ्ठलाची ।
पिपा धरी चरणयुगुल, म्हणे भक्तां ठेवा भाळ ॥
शुध्द पिपा अंतरंग, त्याचा बोलचि अभंग ।
योगीन्द्राचा सरला ताप, गाता पिपाचा प्रताप ॥