Lyrics of Baisla Ha Mathi from album Pipasa Pasarali

बैसला हा माथी
बैसला हा माथी, बाळ कसा साना
हृदयी चरणा, झुलवितो ॥ धृ ॥
सागर प्रेमाचा, चरणी खेळतो ॥
लाटे उडवतो, माझ्यावरती ॥ १ ॥
सागर डोहात, तो ही सागरात ॥
बुडवतो त्यात, माझे मला ॥ २ ॥
त्यालाच माहित, मनीच्या भावना ॥
अनिरुध्द मोहना, तान्हा झाला ॥ ३ ॥
पूर्वा म्हणे वाहो प्रवाह उलट ॥
पुरवावा हट्ट तान्ह्यानेच ॥ ४ ॥