Lyrics of Bai Me Dalan Dalite from album Ailatiri Pailatiri

18. बाई मी दळण दळीते
बाई मी दळण दळिते, माझ्या बापूचं स्मरण करिते॥
आया बाया पुसती सार्या, कोण हा बापू तरी?
मनःसामर्थ्य देण्या, धरणीवरती आला श्रीहरी ॥
नामाचे वैरण करीता करीता, भक्ती वाढत जाई ।
पीठ होऊनी जात्यामधुनी श्रद्धा सबुरी येई ॥
भक्तीमार्ग हा चोख असे हे सांगे सार्या जगा।
प्रेमानंदे साद घाला या रुक्मिणी पांडुरंगा ॥
ध्यान देऊनी ऐका सारे बापू असे हो ज्ञान ।
अनिरुद्धाचे नामस्मरण तारील सार्या जनं ॥