Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Baandh Majhya Mana from album Pipasa 2

Lyrics of Baandh Majhya Mana from album Pipasa 2

बांध माझ्या मना घट्ट तुझ्या पदा



बांध माझ्या मना घट्ट तुझ्या पदा।
सर्व ये त्यागता, ना तुला ॥

लागती देशोधडी रंक राजे किती।
सोडता चरण हे काय झाली स्थिती।
अजून का थांबला, साहवेना मला।
उशीर बहु जाहला, निष्ङ्गळा ॥

वर्ष गेली फुका, स्पष्ट झाल्या चुका।
सूर्य पडला फिका, रात्र झाली खरी।
अजून का थांबला, घे हाती मला।
दुष्टसंग टाकिला, निजकरा ॥

जीणे तुझ्याविना मज घृणाच वाटते ।
कितीही पाहिले तरी दृष्टी वाट पाहते ।
अजून का थांबला, तुडवी लाथे मला ।
त्यात सौख्य लाधला, मी पिपा ॥