Lyrics of Arti Kari Pran Jyoti from album Vaini Mhane

6. आरती करी प्राणज्योती
आरती करी प्राणज्योती प्रेम बापु औक्षणां
बापु माझा म्हणा
मीनाई गाई प्रेमळपणा
स्वयेची तुळशी वृंदावन ॥ धृ ॥
वात्सल्याची सजीव मूर्ती, माया अवघी बापुंवरती
माऊलीतें होई माऊली, जातिवंत मृदुपणा ॥ 1 ॥
कौसल्येची कूस लाघवी, यशोमतीचे हृदय मार्दवी
मातृत्वाची साच आकृती, प्रेमभरीवलोचना ॥ 2 ॥
दिधले जीवन मारूनी मरणा, धरूनी हट्टा मिळविसी चरणा
ऋणी सावळा ‘तुझा लाडका’, वैनीच्या अंगणा ॥ 3 ॥
मीनाताई माय आमुची, मूर्ती सेवा शारण्याची
अनिरुध्दी योग्या आठवणीने, गमे ना गं तुजविना ॥ 4 ॥