Lyrics of Aniruddhachya Charan Sparshe from album Pipasa 2

अनिरुध्दाच्या चरणस्पर्शे पावन झाली कुडी
अनिरुध्दाच्या चरणस्पर्शे पावन झाली कुडी
बापू रे जखडूनी ठेवी पदी ॥ धृ ॥
संत मंडळी भजती तुजला।
मी भिकारी विकतो मजला।
तुझिया प्रेमे विकला गेला।
तोचि उरला जगी॥
मीरा जगली प्राशूनी जहर।
गोरा पुत्रिक तुडवूनी बाळ।
तुझिया प्रेमे मरण्या तत्पर।
तोचि जगला जगी॥
हीच खूण मी बांधून गांठी ।
निघे चालण्या जीवन-पंथी ।
तुझिया प्रेमे तूच सारथी ।
पिपा बसला रथी ॥ ३ ॥