Lyrics of Aniruddha Rekhila Maanasi from album Pipasa 4

अनिरुद्ध रेखीला मानसी
अनिरुद्ध रेखीला मानसी। विश्व बदलले तत्क्षणी।
हा भोळा शिवशंकर। नाही देतसे अंतर॥
सर्व किर्तने ऐकली। सकल शास्त्रेही धुंडली।
कधी ना ऐसे अनुभवले। साकडे जन्माचे सुटले॥
शब्द दिले ह्याने दोन। नियती झाली मौन।
नका हो सोडूया भान। धरू ह्या मंत्रे अभिमान॥
बापू आनंदी जाहला। करूनी अंबज्ञ लेकरा।
अंबज्ञ बोलता आपण। अंबा देतसे कान॥
अंबज्ञ ह्याचेची नाम। अंबज्ञ आपुले काम।
अंबज्ञ ह्याचेची धाम। अंबज्ञी आम्हा आराम॥
कृतज्ञ अंबेच्या चरणी। सादर बापूच्या प्रेमी।
हीच होय अंबज्ञता। दादा जाहला सांगता॥
नाथसंविध् दाखविले। भयाला मरणची आले।
ही इच्छा त्रिनाथांची। बदलवी वळणे जीवनाची॥
संकटी तरण्या बळ देई। प्रगतीच्या वाटेने नेई।
नाथसंविध् अनिरुद्ध। म्हणूनची सर्वांशी बंध॥
पिसाचा नाथ अनिरुद्ध। पिसाची संवित्ती अनिरुद्ध।
धरिता संगत अनिरुद्ध। सकलची नाथसंविध्॥