Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Aniruddha Raayasi from album Pipasa 2

Lyrics of Aniruddha Raayasi from album Pipasa 2

अनिरुध्दरायासी लागतो रे माझा लळा



अनिरुध्दरायासी लागतो रे माझा लळा ।
कोणा नाही इतुके कौतुक,
धर्म ह्याचा आगळा॥ धृ॥

वाटले चिरावी छाती ।
बसवावे हृदयात ।
सुरीचा जो स्पर्श झाला ।
कळ ह्याच्या हृदयात ॥ १ ॥

वृक्षाने सावली द्यावी,
पाणी मुळां घालावे ।
पाणी-सावलीचे नाते ।
मज कळो यावे ॥ २ ॥

गुण ह्याचे अपंरपार।
मी रे कसा पुरणार।
असे कधी म्हणो नये।
पुरविणे ह्याचा गुण ॥

पिपा म्हणे माझ्या रानी।
ह्याने फुलविला मळा।
ह्याचि बाग ह्यासी देऊनी।
पिपा भोगतो कोहळा॥