Lyrics of Aniruddha Nako Re from album Ailatiri Pailatiri

8. अनिरुद्धा नको रे दूर
अनिरुद्धा ...... नको रे दूर आता ठेवू ॥
वेध लागले तव पायांचे नजरेच्या पलीकडले ।
दिगंतरासी दृष्टी शोधे क्षितिजाच्या पलीकडले॥
अर्थावीण हे शब्द तोकडे वाचेच्या पलीकडले ।
नामजपासी वाणी पकडे वैखरीच्या पलीकडले॥
विरहाचे हे अश्रु बोलके मौनाच्या पलीकडले ।
हुंदक्यांचे सूर संपले हृदयाच्या पलीकडले॥
सर्वकाळ तू जवळ असावे स्वप्नाच्या पलीकडले ।
चिंतन पूजन भजन कीर्तने मृत्युच्या पलीकडले॥