Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Aniruddha Naamavar from album Pipasa 3

Lyrics of Aniruddha Naamavar from album Pipasa 3

अनिरुद्ध नामावर



अनिरुद्ध नामावर प्रेम असे जडू दे रे।
सुकणार्‍या रोपाला जल तुझे मिळू दे रे॥

रात्रीच्या अंधाराची भीती अशी छळते रे।
व्यथांच्या जखमांची कळ अशी उठते रे॥
डगमगतो निर्धार निंदावादळवारी रे।
तगमगतो जीव साधा धूर्तांच्या करणी रे॥

पावला पावलासी मी असा पडतो रे।
डोईच्या ओझ्यांनी वृद्ध पिपा थकतो रे॥
सुकले जरी रोप माझे समिधाच व्हाव्या रे।
तुझ्यासाठी सर्व माझे माझ्यासाठी तूच रे॥