Lyrics of Aniruddha Maza from album Gajtiya Dhol

3. अनिरुध्द माझा धावे भक्तिला
अनिरुद्ध माझा धावे भक्तीला, धावे भक्तीला ॥धृ॥
कोण कोणाचा लागाबांधा, पकडून हा आणी ।
काना धरूनी सहजपणाने, लावीतसे मार्गी ॥१॥
जंतर मंतर जादू कलंतर, ना चाले येथे ।
पायधूळ ती उरी लावता, भयबाधा नासे ॥२॥
चालचालता मारी गाठ हा नाती सोडू सुटे, गाठ ना सोडू सुटे ।
मी तर मागू नकोच सोडू, गाठ बरी राहु दे ॥३॥