Lyrics of Aniruddha Majha Vithu Pandharicha from album Pipasa Pasarali

अनिरुध्द माझा विठू पंढरीचा
अनिरुध्द माझा विठू पंढरीचा । माझ्या हृदयीचा आत्माराम ॥ धृ ॥
नंदा माय माझी मूर्ती रुक्मिणीची । दृष्टी करुणेची ठेवीतसे ॥
माझा हा सुचित आहे पुंडलिक । दावितो कौतुक सावळ्याचे ॥ १ ॥
सद्गुरु सावळ्या रूप तुझे गोड । पुरविली होड नयनांची ॥
घननीळ रूप हृदयी गोंदले । चरणी गुंतले चित्त माझे ॥ २ ॥
तुझ्या चरणांशी माझे सारे सुख । नाही मज भूक कैवल्याची ॥
योगीन्द्र म्हणतो दाखवी चरण । अडकले प्राण माझे तेथ ॥ ३ ॥