Lyrics of Anantache Rupi from album Bol Bol Vaache

10. अनंताचे रुपी
अनंताचे रूपी सगुणाचे बीज।
चिरंतन नित्य कैचे पाहू ॥धृ॥
स्वरुप सान्त चक्षुज्ञानपद।
तुजवीण भ्रांत हंस फिरला ॥१॥
सहस्रात शून्य मूलाधार रश्मी ।
अग्रनादभेद शुद्ध रुपा ॥२॥
विटाळली गुंफा चोखटले रंध्र।
सद्गुरुवीण कोण बिंदु फोडी ॥३॥
महाकारणाच्या कळवळ्यापोटी ।
अनिरुद्धे मन वोल्हाटले ॥४॥