Lyrics of Ajun Ka Re from album Pipasa 3

अजून का रे
अजून का रे एकलाच मी तुरुंगात बंदी
पड रे ह्या माझ्या फंदी॥
जे आवडले, हवे वाटले,
तेच धरिले सोडल्या सुसंधी॥
नको नेमके तेच केले,
करायचे ते कधी न केले
धरली दुर्बुद्धी॥
अवमानिले शुद्ध प्रेम,
ना धरिली मी भीड-भाड
पसरली दुर्गंधी॥
अपराध मी फारचि केले,
पश्चात्तापे मी पोळतसे
घे मजला स्कंधी॥
करीता भक्ति तुटकी फुटकी,
विषय न आवरती
बापू करी त्यांना कैदी॥
पिपा गातसे पाप-गीता ही,
ही बहुतांची व्यथा आजही
जाणूनी कर शुद्धी॥