Lyrics of Abhimanyu Lagat Na Re from album Pipasa 2

अभिमन्यु लागत ना रे
अभिमन्यु लागत ना रे।
भाचा या कृष्णाचा॥
मग का मारावे त्याला।
नाही ह्यासी दयामाया॥
ऐसा फुटका हा मामा।
काय येईल अमुच्या कामा ॥
ऐसे नास्तिकांचे बंड।
हाचि खरा चक्रव्यूह ॥
ज्याने जाणिली ही कथा।
त्याची हरिली सर्व व्यथा॥
पिपा म्हणे सोडा घाई।
शिक्षण अनिरुध्दाचे पायी॥
शिकवी कर्माची सबुरी।
चक्रव्यूहा नाश चक्री॥