Lyrics of Abhalachya Bagemadhye from album Bol Bol Vaache

15. आभाळाच्या बागेमध्ये
आभळाच्या बागेमध्ये वेली लावियली।
जल मेघाचे, बीज रवीचे नेती वाढविली ॥धृ॥
उमललेल्या स्वप्नफुलांनी जागृती गंधारली ।
विखुरलेल्या सुषुप्त कणांनी तुर्या जागविली ॥१॥
मधम्य, वैखर, परा, पच्छमा वाकही गहिवरली ।
सहस्त्र दळावरी उत्कल होऊनि अदव धार झरझरली ॥२॥
ह्या बागेतील ह्या वेलीची नाही मुळे राखली ।
मुक्तपणाने उधळून सारी फळेही संपविली ॥३॥
तरीही वाढत राहील माझी गुरुभक्तीची वेली ।
अनिरुद्धाने सकळ होऊनि ऐसी वाढविली ॥४॥
जल मेघाचे, बीज रवीचे नेती वाढविली
आभळाच्या बागेमध्ये वेली लावियली।
जल मेघाचे, बीज रवीचे नेती वाढविली॥धृ॥
वेली नेती वाढविली, वेली नेती वाढविली