Lyrics of Aarti Shree Gurudattachi from album Ganapati Aarti

आरती श्रीगुरूदत्ताची, आरती गुरुमाऊलीची
आरती श्रीगुरुदत्ताची. आरती गुरुमाउलीची
अत्रिनंदना करू वंदना, ज्योत ही परब्रह्माची ॥धृ॥
आरती श्रीगुरुदत्ताची आरती गुरुमाउलीची
दत्तरूप आहे निर्गुण, श्रीदत्तांचे चरण सगुण
अर्पया हो तन मन धन । करा गुरुचे भजन पूजन ॥
पंचप्राणाची अन मोक्षाची आरती वल्लभाची ॥१॥
आरती...
दत्तचरित या हो आळवू, मनमंदिरी तया साठवू
सदा चिन्तनी नाम घेळवू. भक्ति प्रीतीने अंग डोलवू
त्रिगुणाची औदुंबराची । आरती अवधूताची ॥ २ ॥
आरती...
गर्व हुए हो प्रतितोद्धारा, तारावे या भवसंसारा
पापी आम्हा तुम्ही उद्धारा, द्यावा अंकी चरणी धारा ॥
वंदन करितो चरणी नमितो, ऐका हांक पतिताची ।। ३ ।।
आरती...
दया करावी श्रीगुरुदत्ता, अवघ्या अवनी तुमची सत्ता
या संसारा तरण्या आता, मार्ग दाखवा आम्हास पुढता ॥
जन्म कृतार्थ करि गुरुनाथी श्रद्धा अंतरी दोनाची ॥४॥