Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Aarti Parabramha Sadguru Aniruddha from album Ovalu Aarti

Lyrics of Aarti Parabramha Sadguru Aniruddha from album Ovalu Aarti
१०. आरती परब्रह्म सद्गुरु अनिरुद्धा

आरती परब्रह्म सद्गुरु अनिरुद्धा सद्गुरु अनिरुद्धा।।
अकारण कारुण्याची, अखंड वाहतसे गंगा ।।ध्रृ।।
तुझा दॄष्टीक्षेप करी पापांचा नाश
प्रारब्धाचे भोग संपले, आता भक्तिची वाट ।।१।।
निश्‍चयाचा तू महामेरु, विवेकाचा दीप
तुझ्या इच्छे सर्व कर्मे, घडती आपोआप ।।२।।
मूढजन आम्ही कितीही जरी, रंगलो पापात
भक्तीमार्गे क्षणात आणिसी, करुनी शक्तिपात ।।३।।
तव लीलांचे भावे स्मरण, हाची वेदपाठ,
आम्हा हाची वेदपाठ
ज्ञान, कर्म आणि योग, नको मज दे भक्ती नीट ।।४।।