Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Aarti Nanda Mata from album Ovalu Aarti

Lyrics of Aarti Nanda Mata from album Ovalu Aarti

५. आरती नंदामाता



आरती नंदामाता । सगुण साकार माया।
तुझेची गे छत्र आम्हा । तारीसी सत्वर भक्ता ।।ध्रृ।।

वात्सल्याची शुद्ध मूर्ति । आई काळजी वाही ।
धरुनी गे हातासी । माय चालवी बाळासी ।।१।।

दुखले खुपले कधी । अश्रू दाटले नयनी ।
आठव तुझीच येई । भाव साद तुलाची ।। २।।

रक्षिण्यासी अनिरुद्ध । तूची सदैव सिद्ध ।
तुझेची नाम स्मरे । माझा सावळा सिद्ध ।।३।।

श्‍वासोच्छवास अवघा तुझा । तूची चालवावे प्राणा ।
भक्ति शक्ति देऊनिया। माते तारावे आम्हा ।।४।।