Lyrics of Aarti Karito Hanumantachi from album Ganapati Aarti

आरती करितो हनुमंताची
आरती करितो हनुमंताची दासानुदास
हो देवा दासानुदास ।
धडधडत येई धडधडत येई
घेऊनी द्रोणागिरी पर्वत ॥ धृ ॥
एका क्षणे उडी मारूनी, समुद्र पालाणिला ।
हो देवा समुद्र पालाणिला ।
काया वाचा मने, काया वाचा मने,
राया श्रीराम स्मरिला ॥ आरती ॥१॥
अष्टसिद्धी नौनिधी, तुझे आज्ञांकित,
हो देवा तुझे आज्ञांकित ।
निर्मोही तवचित्त, निर्मोही तवचित्त,
साधो तू पूर्ण मुक्त |॥ आरती ॥ २ ॥
दुष्टवासना, असत्य क्रीडा कलियुगी संचरती ।
हो देवा कलियुगी संचरती ।
तुझे नाम स्मरता, तुझे नाम स्मरता ।
वीरा क्षणात विरघळती ॥ आरती ॥ ३ ॥