Lyrics of Aarti Bhakta Tarakachi from album Ovalu Aarti

४. आरती भक्ततारकाची
आरती भक्ततारकाची ।
अनिरुद्ध जगज्जीवनाची ।।ध्रृ।।
वामांगिनी नंदा बैसे । गणसहित आनंदे ।
ऋषी मुनीजन लीलाविशे । गाती तुज मायापाशे ।
भाव पहावा ह्या भोळ्याचा,
सर्व दिशा वाहती तव गाथा,
दिसत शांत मूर्ति ज्याची ।।१।।
सुचित उभाची मागे मागे । त्रयमूर्ति ही भावची मागे।
नामजपाची महती सांगे । प्रसन्न होण्या क्षण न लागे ।
चक्र पद्मधर शीतमुखाचा,
हृदयी प्रेम धरी घन करुणेचा,
दिसत नील मूर्ति ज्याची ।।२।।