Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Aarti Aniruddha from album Ovalu Aarti

Lyrics of Aarti Aniruddha from album Ovalu Aarti

८. आरती अनिरुद्धा वारी संसारदु:खा



आरती अनिरुद्धा । वारी संसारदुःखा ।
जाळीयात फसलो मी । काळ लागला मागा ।।ध्रृ।।

चिन्मय सुखराशी । सर्व व्यापक असशी ।
नानाविध वेश धरिसी । भक्ता हृदयी धरिसी ।।१।।

पुण्याचा लेश नाही । जपतपही नाही ।
आलो मी काकुळती । देवा संभाळी आता ।।२।।

तुझे नाम मुखे गाता । होई सदय तू आता ।
निरवावी मम भ्रांता । मागणे हेची आता ।।३।।

तुझ्याविण कोण तारी । मज पातकी अनाथा ।
मायबाप तूची माझा । माझ्या देवाधिदेवा ।।४।।