Lyrics of Aarti Aniruddha from album Bol Bol Vaache

17. आरती अनिरुद्धा
आरती अनिरुद्धा प्रभू पूर्णब्रह्म शुद्धा
कृपा कटाक्षे सुखविसी मज पूर्णानंदा
ॐ जय जय अनिरुद्धा ॥धृ॥
अज्ञानाचा नाश करूनि तू प्रगटविसी ज्ञाना
प्रभू प्रगटविसी ज्ञाना
पापशुद्धीचा मार्ग दावूनि संपविसी भोगा ॥१॥
भक्तिरसाचा उद्गाता तू प्रगटलासी रामा।
प्रभू प्रगटलासी रामा
सद्धर्माचा बाण सोडूनी मारिसी कलिकाला ॥२॥
स्वयंप्रकाशी स्वयंतेज तू घननीळा कृष्णा ।
प्रभू घननीळा कृष्णा
असंख्य क्रीडा लीला करूनी, पुरविसी सत्कामा ॥३॥
अफाट शक्ति पूर्णपुरुष तू देसी पुरुषार्था ।
प्रभू देसी पुरुषार्था
तुझिया चरणी भाव अर्पूनि, मी झालो तुझा ॥४॥